लंडन : महिलांसाठी भारत हा सर्वात धोकादायक देश असल्याचा निष्कर्ष थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनने पाहणीतून काढला आहे. भारतानंतर दुसऱ्या व तिसºया स्थानी अनुक्रमे अफगाणिस्तान व सीरिया हे देश आहेत.पाहणीचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला. महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांच्या यादीत सोमालिया चौथ्या क्रमांकावर आहे. तिथे १९९१ सालापासून यादवी सुरू असूनही तेथील महिलांना भारताहून कमी जाच सहन करावा लागला आहे असे अहवालात म्हटले आहे. येमेन आठव्या क्रमांकावर आहे.आरोग्याची काळजी, आर्थिक स्रोतांचा लाभ व पक्षपात, लैंगिक हिंसाचार, बिगरलैंगिक हिंसाचार, मानवी तस्करी, परंपरा या मुद्द्यांबाबत जगभरातील ५४८ अभ्यासकांना पाहणीदरम्यान प्रश्न विचारण्यात आले. त्यात भारतातील ४३ अभ्यासकांचा समावेश होता. या सर्वांच्या उत्तरांतून महिलांसाठी भारत हा सर्वात धोकादायक देश असल्याचा निष्कर्ष निघाला.भारतात घरातल्याच व्यक्तीनेवा अनोळखी इसमाने महिलेवर बलात्कार होतात, तिचा लैंगिकछळ होतो. पीडितेला न्यायमिळण्यात अडचणी येतात, असेदिसून आले.दिल्लीतील २०१२ सालच्या निर्भया सामुहिक बलात्कारानंतर महिलांच्या सुरक्षिततबाबत अनेकांनी आवाज उठविला. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी भारतात नवे कायदे करण्यातआले. मात्र परिस्थिती सुधारलेली नाही, असे थॉमस रॉयटर्सफाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोनिक्यू व्हिला यांनीम्हटले आहे. (वृत्तसंस्था)थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनने २०११ साली अशीच पाहणी केली होती. त्यावेळी महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या व पाक पाचव्या क्रमांकावर होता. यंदा पाकिस्तान सहाव्या स्थानी आहे.मोदी व्हिडीओमध्ये मशगुल: राहुल गांधीनवी दिल्ली : सीरिया, अफगाणिस्तान, सौदी अरेबियापेक्षा भारतामध्ये महिलांवर होणाºया बलात्कारांचे प्रमाण अधिक आहे. ज्याप्रमाणे रोम जळत होते त्यावेळी नीरो फिडल वाजवत बसला होता, अगदी देश इतक्या वाईट परिस्थितीतून जात असताना नरेंद्र मोदी मात्र आपल्या उद्यानामध्ये करत असलेल्या योगासनांचे व्हिडिओ बनविण्यात मश्गुल आहेत, अशी उपहासगर्भ टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनच्या अहवालानंतर राहुल गांधी यांनी हे टिष्ट्वट केले.
भारत हा महिलांसाठी सर्वात धोकादायक देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 5:45 AM