न्यू यॉर्क- भारतामध्ये शहरीकरणाचा वेग अत्यंत जास्त असून दिवसेंदिवस हा वेग वाढतच आहे. 2030 साली भारतातील 40 टक्के लोकसंख्या शहरामध्ये स्थायिक झालेली असेल. त्यामुळे 2030 पर्यंत भारताला दरवर्षी एका शिकागो शहराएवढ्या शहराची निर्मिती करावी लागेल असे मत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी व्यक्त केले.
2030 साली आवश्यकता भासेल अशा शहरांसाठी 70 टक्के पायाभूत व्यवस्थांची निर्मिती भारताने करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्राने जगभरातील विकासासाठी 2030 हे लक्ष्य ठेवले आहे. जर भारताला आपले लक्ष्य साध्य करण्यात यश आले तर संयुक्त राष्ट्राचे लक्ष्य साध्य होईल असे मत पुरी यांनी व्यक्त केले. जगभरामध्ये विकसनशील देशांमध्ये शहरीकरण वेगाने होत आहे. 2018-2050 या काळामध्ये भारत, नायजेरिया आणि चीन या देशांचा जागतिक शहरीकरणाच्या वृद्धीतील 35 टक्के वाटा असेल.