शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास विक्रमाला घातली गवसणी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
5
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
6
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
7
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
8
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
9
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
10
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
11
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
12
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
13
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
14
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
16
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
17
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
18
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
19
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
20
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले

भारत-थायलंड महामार्गाचे 70% काम पूर्ण, मोदी सरकार 'या' पॉलिसीमुळे चीनला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 6:06 PM

India Myanmar Thailand Highway: भारतातून थेट थायलंडला जाणाऱ्या महामार्गाये काम प्रगतीपथावर आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये याचे काम सुरू केले होते.

India Myanmar Thailand Highway: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारत ते चीन या एकमेव स्टिलवेल रोडच्या धर्तीवर आशियाई महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम बंगालच्या कोलकत्यातून सुरू झालेला महामार्ग, मणिपूरद्वारे म्यानमार आणि तिथून थेट थायलंडला जाईल. हा मोदी सरकारच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा सर्वात मोठा प्रकल्प असून, याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मीडियाशी बातचीतमध्ये सांगितले की, ते कामाची स्थिती पाहण्यासाठी गेले होते. ताजी परिस्थिती अशी आहे की, या प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. गडकरी म्हणाले की, या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे, परंतु मणिपूरमधील बिघडलेल्या वातावरणामुळे काही समस्या येत आहेत, त्या लवकरच दूर केल्या जातील.

कधी पूर्ण होईल?हा महामार्ग 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर भारतातूनथायलंडला जाणे सोपे होईल. लोक फ्लाइटऐवजी कारने थायलंडला जाऊ शकतील. भारत-म्यानमार आणि थायलंड महामार्ग हे तिन्ही देश मिळून बांधत आहेत. याची एकूण लांबी सुमारे 1400 किलोमीटर आहे. तत्कालीन वाजपेयी सरकारने हा प्रकल्प प्रस्तावित केला होता, मात्र तो केवळ कागदावरच राहिला. त्यानंतर 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू झाले.

असा असेल मार्ग

तीन देशांना जोडणारा हा महामार्ग कोलकात्यापासून सुरू होऊन सिलीगुडीपर्यंत जातो आणि त्यानंतर बंगालच्या श्रीरामपूर सीमेवरून कूचबिहारमार्गे आसाममध्ये प्रवेश करतो. आसाममधून दिमापूर आणि नागालँडचा प्रवास केल्यानंतर, हा मार्ग मणिपूरमधील इंफाळजवळील मोरेह नावाच्या ठिकाणाहून परदेशात म्हणजेच म्यानमारमध्ये प्रवेश करेल. म्यानमारमधील बागो आणि यांगून मार्गे प्रवासी थायलंडमध्ये प्रवेश करतील.

चीनला मोठा धक्का बसणारहा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर भारताच्या ईशान्य भागातील अर्थव्यवस्था सुधारेल, असा विश्वास आहे. यासोबतच चीनला मोठा धक्का बसणार आहे. चीनचा व्यापार आशियाई देशांमध्ये पसरला आहे, पण जेव्हा भारताचा या देशांशी संपर्क वाढेल, तेव्हा या देशांचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल आणि अनेक देश भारताकडे वळतील.

टॅग्स :IndiaभारतThailandथायलंडMyanmarम्यानमारNitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकार