शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

इंडिया, एनडीएची पहिली टेस्ट; संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 7:26 AM

संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

संजय शर्मा

नवी दिल्ली : : विरोधी पक्षांची महाआघाडी ‘इंडिया’ व सरकारचे ‘एनडीए’ यांची पहिली परीक्षा संसदेत सादर होणाऱ्या दिल्ली सरकारच्या अध्यादेशाच्या विधेयकावर होणार आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत असून, ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. सरकारने बुधवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट झाले आहे. विरोधक मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरून केंद्र सरकारला घेरणार आहेत. यासाठी मणिपूरच्या मुद्यावर संसदेत थेट पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी केली आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, सरकारच्या अजेंड्यामध्ये ३१ विषय आहेत. यात सर्वप्रथम दिल्लीतील अध्यदेशाशी संबंधित विधेयक आहे.

राज्यसभेत खरी परीक्षा

nया विधेयकावर ‘इंडिया’ची परीक्षा राज्यसभेत होणार आहे. कारण तेथे सरकारकडे बहुमत नाही. लोकसभेत सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे तेथे कोणतीही अडचण येणार नाही; परंतु राज्यसभेत भाजप व एनडीए मिळून ही संख्या १११ होते. n२३७ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक पारित करण्यासाठी सरकारला ११९ संख्येची गरज भासणार आहे. ही संख्या विद्यमान सदस्य संख्येपेक्षा ८ ने जास्त आहे. या आठ खासदारांसाठी सरकारला बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेसची मदत घ्यावी लागू शकते. nदोन्ही पक्षांचे राज्यसभेत प्रत्येकी ९ सदस्य आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसनेही या विधेयकाच्या विरोधात मत देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या हेतूवर शंका

सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडताच संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, सरकार मणिपूरसह सर्व मुद्यांवर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती जसे निर्देश देतील, त्यानुसार सरकार चर्चा घडवून आणणार आहे.सरकारच्या या आश्वासनानंतरही विरोधी पक्षांना सरकारच्या संसद चालवू देण्याच्या हेतूवर शंका आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी माध्यमांसमोर सरकारला आवाहन करताना म्हटले आहे की, विरोधकांना आपले मुद्दे मांडता यावेत, यासाठी सरकारने संसद चालू द्यावी.याच्या उत्तरात प्रल्हाद जोशी म्हणाले की, संसदेत गदारोळ कोण करतो, कोण संसदेचे कामकाज बाधित करतो, हे सर्व जनता जाणते. सरकार तर संसद चालवू इच्छिते.  

महत्त्वाची विधेयके कोणती?

या अधिवेशनात जे प्रमुख विधेयके मांडली जाणार आहेत, त्यात दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक २०२३, पोस्टल सेवा विधेयक, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि बँक विधेयक २०२३, जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक २०२३, जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक २०२३, प्रेस आणि मॅगझिन नोंदणी विधेयक २०२३ आदींचा समावेश आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस