काठमांडूः नेपाळनेभारताशी असलेला संघर्ष आणखी वाढवण्याचं जवळपास निश्चित केलेलं दिसतंय. पहिल्यांदा आपल्या अधिकृत नकाशामध्ये भारताची क्षेत्रे दाखवली आणि आता 12 वर्षांनंतर भारतीय सीमेवरील रस्त्याचं काम पुन्हा सुरू केलं आहे. हा रस्ता उत्तराखंडमधील धारचुला गावातून जातो. धारचुला-टिनकर या 130 किमीच्या रस्त्याच्या भागातील 50 किलोमीटरचा रस्ता हा उत्तराखंडशी जोडलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकल्पाला 2008 मध्ये परवानगी देण्यात आली होती. हा रस्ता बनवण्यामागे टिनकर खिंडीतून नेपाळ आणि चीनमधील व्यापारास चालना देण्याचा हेतू आहे. या रस्त्याचा उर्वरित भाग आता नेपाळ आर्मी पूर्ण करणार आहे.नेपाळला हा रस्ता आताच का आठवला?नेपाळला हा रस्ता आताच का आठवला असेल, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. पण त्याला कारणही तसंच आहे. 8 मे रोजी धारचुला ते लिपुलेख खिंडीला जोडणार्या 80 किमी लांबीच्या रस्त्याचे भारताने उद्घाटन केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तवाघाट-लिपुलेख मार्गाचे उद्घाटन झाले. कैलास मानसरोवराला भेट देण्यासाठी या रस्त्यामुळे कमी वेळ लागेल, असे त्यांनी म्हटले होते.ठेकेदार काम सोडून पळाला होताहा रस्ता गेल्या 12 वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. याचा केवळ 43 किमीचा रस्ता तयार झाला होता. इथला भूभाग हा अत्यंत धोकादायक तर आहेच, पण हवामानाचाही भरवसा नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षांपूर्वी रस्ता तयार करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे तोटा वाढत होता, त्यामुळे कंत्राटदारही काम सोडून पळून गेला होता. नेपाळ सरकारचा असा विश्वास आहे की, या रस्त्याच्या बांधकामामुळे केवळ व्यापारच वाढणार नाही, तर यात्रेकरू आणि पर्यटकांची संख्याही वाढेल.नेपाळ आर्मी तयार करत आहे बेस कॅम्प भारताने धारचुला-लिपुलेक रस्ता खुला केला, तेव्हा नेपाळमध्ये जोरदार विरोध झाला. तेथील सरकारने सांगितले की, हा पास नंतर नेपाळच्या हद्दीत येतो. हा रस्ता पूर्णपणे भारतीय हद्दीत असल्याचे भारताने स्पष्ट केले होते. नेपाळला हरकत होती तर त्यांनी रस्ता बांधत असतानाच आक्षेप नोंदवायला हवा होता. रस्ता प्रकल्प सुरू करण्यामागील अधिकृत कारण म्हणजे टिनकर व छांगरू लोक ये-जा करू शकतील. उर्वरित राहिलेला 87 किमी रस्ता पूर्ण करण्यासाठी नेपाळ सैन्याने घाटियाबघर येथे तळ शिबीर तयार करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा
Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल
Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश
दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ
मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला
लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं