थॉमस बाक यांची भारतभेट : पंतप्रधानांनी प्रस्ताव दिला नाहीनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी आज भारताच्या २0२४ च्या आॅलिम्पिक यजमानपदाच्या दावेदारीच्या शक्यतेविषयी होणाऱ्या युक्तिवादाला पूर्णविराम देताना पंतप्रधानांनी बैठकीदरम्यान याविषयीचा प्रस्ताव दिला नसल्याचे म्हटले आहे.राष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेचे गेल्या वर्षीच निलंबन समाप्त झाल्यामुळे आता यशस्वी खेळांचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही, असे आयओसीला वाटत असल्याचे बाक म्हणाले. २0१३ मध्ये आयओसीचे अध्यक्ष झाल्यानंतर बाक प्रथमच भारत दौऱ्यावर आले. बाक यांनी भारतातील एकदिवसीय दौऱ्यादरम्यान आज सायंकाळी पंतप्रधानांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. त्याआधी बाक यांनी भारतीय आॅलिम्पिक महासंघ आणि क्रीडा मंत्रालयाच्या अव्वल अधिकाऱ्यांशी वेगवेगळी चर्चा केली.यासाठी पूर्ण तयारी आणि परिपूर्ण माहितीनंतरच आॅलिम्पिकचे यजमानपद घ्यायला हवे असे पंतप्रधानांचे मत आहे. त्यामुळे यजमानपदासाठी आधी पंतप्रधानांकडून मान्यता असायला हवी, असे बाक यांनी सांगितले. बाक म्हणाले, आॅलिम्पिक यजमानपदाविषयीच्या चर्चेची माहिती होती. त्यामुळे थोडे आश्चर्य वाटले. कारण भारतासाठी स्पर्धेचे यजमानपद पत्करणे घाईचे ठरले असते. भारताचे गेल्या वर्षीच निलंबन संपले याचा आपल्याला आनंद वाटतोय; परंतु आयओएला आपली स्थिती आणखी मजबूत करायची आहे.बाक यांनी पंतप्रधानांसोबतची चर्चा चांगली झाल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आॅलिम्पिकच्या यजमानपदाविषयीच्या संभाव्य दावेदारीविषयीही चर्चा झाली. तथापि, पंतप्रधान दावेदारी सादर करण्याआधी पूर्णपणे तयारी करूइच्छितात आणि त्यातील परिपूर्णता प्राप्त करूइच्छितात. पंतप्रधानांनुसार २0२४ च्या यशस्वी दावेदारी (१५ सप्टेंबरच्या डेडलाईनआधी) करणे कठीण आहे.’’बाक यांनी सांगितले की, भारत सरकार, आयओए आणि आयओसीदरम्यान एका करारावर स्वाक्षरी झाली आहे. त्यानुसार जगातील सर्वोच्च क्रीडा संस्था ‘‘प्रशिक्षण, क्रीडा औद्योगिकरण, क्रीडा प्रशासक आणि प्रशिक्षकांना प्रशिक्षण’ यात मदत करेल आणि खेळातील द्विपक्षीय सहयोग स्थापन करेल.’ त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांना आयओसीची एक बैठक भारतात आयोजित करण्याचे निमंत्रणही दिले. (वृत्तसंस्था)भारत खेळाच्या पायाभूत सुविधांचे केंद्र व्हावेच्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत खेळाच्या पायाभूत सुविधांचे आणि साधनांच्या निर्माणाचे एक मुख्य केंद्र व्हावे यासाठी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओसी)कडून मदत घेण्यासाठी म्हटले आहे. च्बैठकीदरम्यान मोदी यांनी म्हटले, कोणत्याही देशासाठी आपल्या नागरिकांमध्ये खिलाडूवृत्तीसाठी खेळ आवश्यक आहे आणि जो समाजासाठी एक धागेने जोडला जातो.च्पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, मोदी यांनी भारत हा सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देश असून येथे क्रीडा विकासाला अधिक वाव आहे. खेळाच्या पायाभूत सुविधा, औद्योगिकरण व क्रीडा साहित्य उत्पादनाचे केंद्र बनण्यासाठी आयओसी अध्यक्षांकडून पाठिंब्याची मागणी केली.
भारताला यजमानपद नाही
By admin | Published: April 27, 2015 11:32 PM