ऑनलाइन लोकमत
सेऊल, दि. २३ - भारताला आण्विक पुरवठादार समूहाच्या (NSG) सदस्यत्वाला पाच देशांनी विरोध दर्शविला आहे.
सेऊल येथे आण्विक पुरवठादार समूहाच्या प्रतिनिधीमंडळाची आज बैठक झाली असून यामध्ये भारताने आण्विक पुरवठादार समूहाचे सदस्यत्व मिळावे, यासाठी मागणी करण्यात आली होती.
या बैठकीत चीन, ब्राझिल, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, आर्यलंड आणि तुर्की या देशांनी भारताला आण्विक पुरवठादार समूहाचे सदस्यत्व देण्यास विरोध केला आहे.