शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

I.N.D.I.A मधून NDA त येताच JDUचे काँग्रेसवर गंभीर आरोप, केला सनसनाटी दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 1:45 PM

Bihar Political Update: लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाला आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात उभ्या राहत असलेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाला आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात उभ्या राहत असलेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तसेच बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला परत एकदा विरोधात बसावे लागणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर जेडीयूचे दिग्गज नेते के.सी. त्यागी यांनी काँग्रेसबाबत सनसनाटी दावा केला आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीचं नेतृत्व बळकवायचं होतं.  ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढे करून काँग्रेसनं चाल खेळली होती. मात्र खर्गे यांनी नंतर नकार दिला होता. तसेच आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार बनणार नसल्याचे सांगितले होते. 

के.सी. त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांनी सर्वांना सोबत घेऊन इंडिया आघाडीची बांधणी केली होती. देशभरात फिरून सर्वांना एकत्र आणले होते. इंडिया आघाडी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा न करताच लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे ठरवण्यात आले होते. मात्र काँग्रेसच्या मनात खोट होती. त्यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व हडपण्यासाठी खर्गेंचं नाव पुढे केलं होतं, असा दावा के. सी. त्यागी यांनी केला. इंडिया आघाडीत एकमत होत नसल्याने नितीश कुमार नाराज होते. काँग्रेसची भूमिका त्यांना खटकली होती.

जेडीयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी म्हणाले की, काँग्रेस प्रादेशिक पक्षांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जींचा पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, जेडीयू असो, वा शरद पवार यांचा पक्ष असो, हे सर्व पक्ष काँग्रेसशी लढूनच तयार झाले आहेत. काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या एवढ्याही जागा मिळवता आल्या नव्हत्या. काँग्रेससमोर सध्या अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे. त्यामुळेच ते प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनू इच्छित होते. मात्र हे होऊ शकलं नाही, त्यामुळे ते नाराज झाले आणि अखेरीस आपला जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपासोबत एनडीएमध्ये गेले, असा आरोप नितीश कुमार यांच्यावर होत आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी