राष्ट्रपतींच्या निमंत्रण पत्रिकेवर इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख झाला आणि येत्या विशेष अधिवेशनात काय होणार आहे याची कल्पना देशवासियांना आली आहे. घटनेतील इंडिया हा शब्द काढून टाकला जाऊ शकतो, यासाठी सुधारणा विधेयक आणले जाणार आहे. यातच इंडिया की भारत अशा दोन नावांच्या द्विधा मनस्थितीत असताना सोशल मीडियावर भारत हा शब्द कालच्या दिवसातील सर्वाधिकवेळा सर्चमध्ये आला आहे.
इंडिया आणि भारत हे नाव कसे ठेवले गेले...; जाणून घ्या संविधान बनवितानाची कहानी
ट्विटर म्हणजेच आताच्या एक्सवर मंगळवारी भारत हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च केला गेला आहे. जगभरात भारत हा की वर्ड सर्वाधिकवेळा वापरला गेला आहे. जगभरातील युजर्सनी चार लाख ७४ हजार वेळा भारत कीवर्ड आपल्या पोस्टमध्ये वापरला आहे.
G20 शिखर परिषद 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. राष्ट्रपती भवनातून परदेशी पाहुण्यांना डिनरमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पत्र पाठवण्यात आले आहे. निमंत्रण पत्रावर इंडियाच्या राष्ट्रपतींऐवजी 'भारत'चे राष्ट्रपती लिहिले होते. यावरून दिवसभर बराच वाद झाला आहे.
हे आहेत सर्वाधिक वापरलेले कीवर्ड...भारत: 474kBeyonce: 350kकलम 1: 284kप्रदामोडे: 253 किमीशिक्षक दिन: 165kकार्डी: 116kपुग्डेमॉन्ट: 110kक्लेमसन: 100kड्यूक: 83kwwe raw: 81k