शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

महिला संचालकांत जगात भारताचे स्थान २६ व्या क्रमांकावर

By admin | Published: March 08, 2016 2:35 AM

विविध क्षेत्रात महिला उच्चपदे भूषवीत असताना भारतीय कंपन्यांत मात्र उच्चपदावरील महिलांची संख्या आजही कमी आहे.

नवी दिल्ली : विविध क्षेत्रात महिला उच्चपदे भूषवीत असताना भारतीय कंपन्यांत मात्र उच्चपदावरील महिलांची संख्या आजही कमी आहे. कंपन्यांच्या संचालक मंडळात महिलांचे प्रमाण पाहिले, तर ७ .० टक्क्यांसह भारत २६ व्या क्रमांकावर आहे, तर नॉर्वे ४० टक्के प्रमाणासह पहिल्या स्थानी आहे. माय हायरिंग क्लब डॉट कॉम आणि जॉब पोर्टल डॉट को डाट इनच्या ‘संचालक मंडळात महिला’ सर्वेक्षणानुसार भारतीय कंपन्यांतील संचालक मंडळात महिला सदस्यांची संख्या विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे. भारताने वरिष्ठ व्यवस्थापन पदावर महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळात महिला सदस्यांची संख्या अत्यंत कमी आहे. विकसित देशांच्या एकूण सरासरीच्या तुलनेत कमी आहे, असे राजेश कुमार यांनी सांगितले. या सर्वेक्षणात जगभरातील एकूण ३८,३१३ नोंदणीकृत कंपन्याचा सहभाग घेतला, तर भारतातील १,४५९ नोंदणीकृत कंपन्याचा सहभाग घेतला.४० टक्के प्रमाणाने नॉर्वे पहिल्या स्थानीभारतातील नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळातील महिला संचालकांची एकूण टक्केवारी ६.९१ टक्के असून मागच्या वर्षी हे प्रमाण ६.६९ टक्के होते. नॉर्वेत संचालक मंडळात महिला सदस्यांचे प्रमाण ४०.१२ टक्के असून या बाबतीत नॉर्वे जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर स्वीडन (२९.३१ टक्के), फिनलँड (२५.८९ टक्के), दक्षिण आफ्रिका (१८.३१ टक्के) आणि अमेरिकेचा (१७.३७ टक्के) क्रमांक लागतो. जागतिक पातळीवर महिला संचालकांचा कार्यकाळ २ वर्षे आहे. भारतात मात्र हा कालावधी फक्त एक वर्ष आहे. भारतीय उद्योग क्षेत्रानेही महिला संचालकांचा कार्यकाळ वाढविण्याच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे असल्याचे यात सुचित केले.