नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८१व्या स्थानावर आला आहे. याशिवाय लाचखोरी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत अत्यंत सुमार कामगिरी असलेल्या देशांत भारताचा क्रमांक लागला आहे.ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या ‘जागतिक भ्रष्टाचार अनुभूती निर्देशांक २0१७’मध्ये भारत ८१वा आहे. या निर्देशांकात जगातील १८0 देशांचा समावेश आहे. सन २0१६ साली १७६ देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान ७९वे होते. या निर्देशांकासाठी भ्रष्टाचाराच्या बाबतीत 0 ते १00 असे गुणांकन करण्यात आले. 0 गुण म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट देश, तर १00 गुण म्हणजे सर्वाधिक स्वच्छ देश, अशी पट्टी वापरण्यात आली. ताज्या मानांकनात भारताचे गुण ४0 इतके स्थिर राहिले. २0१५मध्ये ते ३८ होते. ताज्या मानांकनात न्यू झीलंड आणि डेन्मार्क अनुक्रमे ८९ व ८८ गुण मिळवून सर्वोच्च स्थानी आहेत. सीरिया, दक्षिण आफ्रिका व सोमालिया या देशांना सर्वांत कमी अनुक्रमे १४, १२ व ९ गुण मिळाले आहेत. ४१ गुणांसह चीन ७७व्या स्थानी आहे. ब्राझील ३७ गुणांसह ९६व्या स्थानी, तर रशिया २९ गुणांसह १३५व्या स्थानी आहे.आशिया-प्रशांत विभागातील काही देशांत पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेते व कायदेपालन संस्थांच्या कर्मचाºयांना धमक्या दिल्या जातात. हत्याही होतात.फिलिपिन्स, भारत व मालदीवमध्ये हे प्रकार सर्वाधिक आहेत. या देशांत भ्रष्टाचार प्रचंड आहे आणि माध्यमस्वातंत्र्य मर्यादित आहे. या देशांत पत्रकारांच्या हत्यांचे प्रमाणही अधिक आहे.गेल्या सहा वर्षांत भ्रष्टाचाराच्या बातम्यांवर काम करणाºया१५ पत्रकारांच्या हत्या या देशांत झाल्या, असे कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट (पत्रकार संरक्षण समिती) या संस्थेने जाहीर केले.
भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८१व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:23 AM