इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या (ICOA) ग्लोबल एअरलाइन सेफ्टी रँकिंगमध्ये भारत 48 व्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी चार वर्षांपूर्वी देश 102 व्या क्रमांकावर होता. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की सिंगापूर या क्रमवारीत अव्वल आहे. त्यानंतर यूएई आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो. या यादीत चीन 49 व्या स्थानावर आहे.
नियामकाने भारताच्या सुरक्षा क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि त्याचे परिणाम दिसून येत आहेत, अशी प्रतिक्रिया नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार यांनी शनिवारी पीटीआयला दिली. याशिवाय, देशाच्या दिल्ली, वाराणसी आणि बंगळुरू विमानतळांवर देशांतर्गत प्रवाशांसाठी गुरुवारपासून फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी (FRT) वर आधारित नवीन प्रणाली सुरू झाली आहे. यामध्ये प्रवाशाला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखता येईल आणि डिजी-यात्रा मोबाईल अॅपद्वारे विमानतळांवर पेपरलेस एन्ट्री करता येईल. त्यांच्या प्रवासाच्या डेटावर चेहऱ्याच्या ओळखीद्वारे सुरक्षा तपासणी आणि इतर चेक पॉइंट्सवर आपोआप प्रोसेस केली जाईल.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (IGIA) टर्मिनल-3 साठी डिजी-यात्रेचा औपचारिक शुभारंभ केला. मार्च 2023 पासून ते हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि विजयवाडा येथेही याची सुरूवात होणार आहे. लवकरच हे तंत्रज्ञान देशभरातील विमानतळांवर सुरू होईल.
या नवीन प्रणालीसाठी बनवलेल्या डिजी-यात्रा मोबाइल अॅपचे बीटा व्हर्जन दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड 15 ऑगस्ट रोजी लाँच केले होते. ॲपची नोडल एजन्सी डिजी-यात्रा फाउंडेशन, एक ना-नफा संस्था आहे आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासह कोची, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये भागीदारीही आहे.