शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रोजच्या कोरोना रुग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 07:50 IST

रशिया, इंग्लंड मागे पडले : देशात अजून कळस गाठला जायचा आहे, तज्ज्ञांना वाटते काळजी, अनेक देशांमध्ये नवीन कोरोना लाटेचीही भीती

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासून प्रथमच भारत जगात कोविड-१९ रुग्णांच्या रोज वाढणाºया संख्येत तिसºया पायरीवर आला आहे. तथापि, भारत जगात एकूण रुग्णसंख्येत अजून सहाव्या स्थानी आहे; परंतु जगात रोज रुग्णांची जी संख्या वाढत आहे त्यात भारताचे स्थान तिसरे आहे. १० जून रोजी भारतात ९,९८७ रुग्णांची नोंद झाली व त्यामुळे रशियाला भारताने चौथ्या पायरीवर ढकलले. रशियाची रुग्णसंख्या ८,९८५ आहे. मंगळवारी रशियात रुग्ण होते १०,९८४ तर भारतात ९,९८३. मात्र, बुधवारी भारतात रुग्णसंख्या ९,९८७ झाली, तर रशियातील रुग्णसंख्या घसरून ८,९८५ झाली.वस्तुस्थिती अशी की, अमेरिकेत रुग्णसंख्या ९ जून रोजी घसरल्याचे (२०,४४२ वरून १७,०४४) दिसते. ब्राझीलमध्ये रुग्णसंख्येत मोठीच घसरण झाली. तेथे २५,९६९ रुग्ण होते ते १६,००४ वर आले. इंग्लंडमध्ये ९ जून रोजी रुग्ण १,२०५ होते, तर फक्त २४० रुग्ण स्पेनमध्ये होते. जगातील पहिल्या दहा देशांत भारत हा कदाचित एकमेव देश आहे जेथे रोजच्या रोज मोठ्या संख्येने कोविड-१९ चे रुग्ण वाढत आहेत. अमेरिका, ब्राझील, इंग्लंड, स्पेन, रशिया किंवा इतर देशांमध्ये रुग्णसंख्या घटत आहे. जगात ९ जून रोजी सकाळी ९ वाजता अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन आणि इंग्लंडनंतर एकूण रुग्णसंख्येत भारत सहाव्या पायरीवर असावा. मात्र, रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिला, तर या आठवड्यात तो रुग्णसंख्येत चौथ्या पायरीवर असेल. तज्ज्ञांचे म्हणणे असे की, भारतात अजून कोविड-१९ ने कळस गाठलेला नाही, तर बहुतेक पाश्चिमात्य देशांमध्ये हा वेग आडवा होऊन खाली येत आहे.रुग्णालयांत जागेची टंचाईनितीन अग्रवाल ।

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना रुग्ण अतिशय वेगाने वाढत असून, रुग्णालयांत खाटांच्या टंचाईवरून राजकीय संघर्षही सुरू झाला आहे. रेल्वेने ५,२३१ डब्यांमध्ये रुग्णांसाठी बनवले गेलेले ८० हजार बेडस् ही गरज भागवू शकतात; परंतु प्रत्यक्षात ते सध्या प्रदर्शनीय बनले आहेत.दिल्लीत त्यातील दहा कोच कोरोना रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक कोचमध्ये १६ जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याची व्यवस्था आहे. कोचमध्ये पंखे आणि प्रकाशाची व्यवस्था केली गेली आहे. शौचालयांना स्नानगृह बनवले आहे. याशिवाय मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगचीही व्यवस्था आहे. रेल्वेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हटले होते की, देशभरात ८० हजारांपेक्षा जास्त बेडस् असलेले ५,२३१ कोच तयार केले गेले असून, ते २१५ स्थानकांवर तैनात केले गेले आहेत. १३० स्थानकांवर ही व्यवस्था राज्य सरकारांनी करायची आहे. यासाठी रेल्वेने २,५४६ पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि ३५,१५३ पॅरामेडिकल स्टाफदेखील तयार केला आहे.

कोविड-१९ रुग्णांत रोज होणारी वाढदेश ९ जून ८ जून ७ जून ६ जूनअमेरिका १७,०४४ २०,४४२ ४२,८९० २३,००१ब्राझील १६,००४ २५,९६९ ३०,१०३ ३१,३९२भारत ९,९८७ ९,९८३ ९,९७१ ९,९८७रशिया ८,९०५ १०,९८४ ८,८५५ ८,७२६इंग्लंड १,२०५ १,३२६ १५५७ १,६५०स्पेन २४० — ३३२ ६५२स्रोत : वर्ल्डमीटर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल