शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

पुढील वर्षी भारत कोरोना लसीचे 5 अब्ज डोस बनविण्यास तयार; मोदींचे G20 परिषदेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 6:57 AM

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देताना परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरु करण्यावरही भर दिला आणि परस्पर मान्यताप्राप्त लसीकरण प्रमाणपत्रांची प्रणाली तयार करण्यावर भर दिला.

भारत पुढील वर्षाच्या अखेरीस कोरोना लसीचे पाच अब्ज डोस तयार करण्यास तयार आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रोममधील G20 शिखर परिषदेत केले. कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताचे योगदान अधोरेखित केले.

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देताना परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरु करण्यावरही भर दिला आणि परस्पर मान्यताप्राप्त लसीकरण प्रमाणपत्रांची प्रणाली तयार करण्यावर भर दिला.जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताने विकसित केलेल्या कोवॅक्सीनला आपत्कालीन वापरासाठी अधिकृत करण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. या लसीला मान्यता मिळाल्यास भारत इतर देशांना मदत करू शकेल, असेही म्हटले. आपत्कालीन वापरासाठी लस सूचित करण्यासाठी अंतिम 'धोका-फायदा मूल्यांकन' करण्यासाठी UN आरोग्य संस्थेच्या तांत्रिक सल्लागार गटाची 3 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे.  

भारत बायोटेकने विकसित केलेली कोवॅक्सीन आणि अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोविशील्ड भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. मोदींनी महामारीच्या काळात 150 देशांना केलेला वैद्यकीय पुरवठा आणि जागतिक पुरवठा साखळी राखण्यात भारताचे योगदान अधोरेखित केले. श्रृंगला म्हणाले की, जी-20 बैठकीअंतर्गत आयोजित 'ग्लोबल इकॉनॉमी अँड ग्लोबल हेल्थ' सत्रात मोदींनी हे भाष्य केले.

लवचिक जागतिक पुरवठा साखळीच्या गरजेवर भर देत, मोदींनी भारताच्या धाडसी आर्थिक सुधारणेवर भाष्य केले आणि पुरवठा साखळीतील आर्थिक वाढ आणि विविधीकरणासाठी G20 देशांना भागीदारी करण्यासाठी आमंत्रित केले. श्रृंगला म्हणाले की, महामारी आणि भविष्यातील जागतिक आरोग्य समस्यांशी लढा देण्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी 'एक पृथ्वी, एक आरोग्य' ही संकल्पना मांडली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी