नवी दिल्ली : दिवाळी तोंडावर आलेली असल्यामुळे देशातील लायटिंग मार्केट सजले आहे. १ हजार कोटी रुपयांच्या या बाजारावर अनेक वर्षांपासून चीनचा जवळपास १०० टक्के ताबा होता. मात्र, चीनच्या मक्तेदारीला काही मोठ्या प्रमाणात मोडण्यात यश आले आहे. गलवान संघर्षानंतर ग्राहकांनी मेड इन इंडिया लायटिंगला पसंती दिली. त्यामुळे आता ३० ते ४० टक्के स्वदेशी लायटिंगची विक्री होत आहे.
यंदा डिझायनर (जॉय) लायटिंगची मागणी अधिक आहे. ओरिएंट इलेक्ट्रिकचे ईव्हीपी पुनित धवन यांनी सांगितले की, दिवाळीत जॉय लायटिंगचा व्यवसाय ८० ते १०० कोटी रुपयांचा होतो. यंदा स्वदेशी कंपन्यांनी दिवे, गणपती, स्वस्तिक इत्यादी डिझाइन बाजारात आणले आहेत. ५० हजार डीलर्स या व्यवसायात आहेत.
२३००० कोटींचा व्यवसाय‘इलेक्ट्रिक लॅम्प अँड कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, देशात एलईडीचा व्यवसाय २३ हजार कोटी रुपयांचा आहे. त्यात कंझ्युमर लायटिंगची हिस्सेदारी ६० टक्के आहे.
मोबाइल, लॅपटॉप नियंत्रित लायटिंगयंदा रंग बदलणारी व डीम होणारी लायटिंग तर बाजारात आहेच, पण रिमोट कंट्रोल तसेच मोबाइल व लॅपटॉपवरून नियंत्रित होणारी लायटिंगही आहे. या लायटिंगची जुळणी देशातच केली जात आहे. मागील ५ वर्षांपासून वीज वाचविणारी लायटिंग उपलब्ध आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी होत आहे.
एलईडी निर्मिती बाहेर, जुळणी देशात