नवी दिल्ली-
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा १७,८०१ इतका झाला आहे.
कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण ९८.७४ टक्के इतकं आहे. तर गेल्या २४ तासांत देशात २,४९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली तर दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
देशात गुरुवारी ३,३,०३ नव्या रुग्णांची भर पडली होती. तर मंगळवारी हाच आकडा २,९२७ इतका होता. तर ३२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. आज थेट ६० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ०.७१ टक्के इतका झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.६३ टक्के इतका झाला आहे. देशात आतापर्यंत ४,२५,३०,६२२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा ५,२३,७५३ इतका झाला आहे.