शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

CoronaVirus News: देशासाठी पॉझिटिव्ह बातमी; सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच 'असं' घडलं

By कुणाल गवाणकर | Published: December 27, 2020 11:04 AM

CoronaVirus News: देशाच्या सर्व राज्यांमधील रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि अधिक धोकादायक स्ट्रेन सापडल्यानं जगाची चिंता वाढली. गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून बरेच भारतीय मायदेशी परतल्यानं धोका वाढला आहे. त्यामुळे ब्रिटनहून माघारी परतलेल्यांचा शोध सुरू आहे. नव्या स्ट्रेनमुळे काळजी वाढली असताना देशाला दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. काल दिवसभरात देशात १८ हजार ७३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १ जुलैपासून प्रथमच देशात इतक्या कमी संख्येनं कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत देशात २७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ४७ हजार ६२२ वर पोहोचली. देशात आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्याच्या घडीला २ लाख ७८ हजार ६९० जणांवर उपचार सुरू आहे.देशात सर्वाधित कोरोना रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १९ लाखांच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडा ५० हजारांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ८५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ६० जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली आणि केरळला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सध्याच्या घडीला देशातील सर्व राज्यांमधील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या