अफगाणिस्तानमध्येतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर भारताचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. देशाच्या सीमेपलिकडे सुरू असलेल्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आत्मनिर्भर आहे, असं प्रल्हाद जोशी म्हणाले आहेत. भारत दहशतवादासारख्या परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी संपूर्णपणे सज्ज आणि आत्मनिर्भर आहे, असंही प्रल्हाद जोशी म्हणाले.
"दहशतवादाविरोधात भारत झिरो टोलरन्स नितीचं पालन करतो. ते लोक इतर देशांमध्ये अडचणी निर्माण करण्याचं काम करतील, पण मोदी सरकारनं गेल्या सात वर्षात देशात झिडो टोलरन्स नितीवर जोर दिला आहे. त्यामुळे आपल्याला घोबरण्याचं कोणतंच कारण नाही", असं प्रल्हाद जोशी म्हणाले.
अफगाणिस्तानमध्येतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशाचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला आहे. तालिबान्यांनी रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा करत संपूर्ण देशावर नियंत्रण मिळवलं आहे. त्यांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून शेकडो लोक अफगाणिस्तान सोडण्यासाठी धावपळ करत आहेत. काबुलच्या विमानतळावर अफगाणी नागरिक देश सोडून जाण्यासाठी गर्दी करत आहेत.