नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याला आणि एनआरसीला विरोध करणाऱ्या मोर्चात भडकाऊ भाषण करणाऱ्या जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड होत आहे. भारताला इस्लामिक देश करण्याचं स्वप्न आहे असं शरजीलने सांगितले. दिल्लीपोलिसांच्या चौकशीत हे समोर आलं.
सध्या शरजील इमाम पोलिसांच्या रिमांडमध्ये आहे. अनेक कट्टरपंथीच्या प्रभावाखाली शरजील असल्याने त्याला अटक झाल्याचा कोणताही पश्चाताप नाही असं पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार शरजील इमाम हा धर्मासाठी कट्टर आहे. त्याला भारताला मुस्लीम राष्ट्र बनवायचं आहे. तसेच त्याचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात कुठेही छेडछाड करण्यात आली नाही हे त्याने कबूल केलं आहे. सध्या त्याच्या व्हिडीओची तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये केली जात आहे.
पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे की, शरजील इस्लामिक युथ फेडरेशन अँन्ड पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी त्याचं कनेक्शन आहे का? सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलनात या संघटनेचं नाव प्रखरतेने समोर आलं. पीएफआय ही कट्टर आणि उग्र मुस्लीम संघटना आहे. यावर बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'शरजीलकडे बरीच संशयास्पद माहिती आहे. त्याच्याशी आतापर्यंत झालेल्या बोलण्यावरून हे सिद्ध झाले आहे की पीएफआय देखील काही प्रमाणात शरजीलच्या मागे आहे. परंतु याची पुष्टी करण्यासाठी अधिक वेळ गरजेचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी पथके काही काळ शरजीलची चौकशी करीत दुसर्या ठिकाणी घेऊन जात आहेत, ज्यामुळे तो मानसिक दबावाखाली राहिल. तसेच पोलिसांना कोणतीही धडपड केल्याशिवाय शरजील इमामकडून जास्तीत जास्त माहिती जमा करायची आहे. दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या एका सूत्रानुसार, पोलिसांपासून बचाव करण्यासाठी इकडे-तिथे लपून बसलेला शरजील तीन-चार दिवस नीट झोपू शकला नाही.
मंगळवारी अटक झाल्यानंतर त्याची चौकशी सतत सुरु आहे. बुधवारी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने शरजीलला ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवलं. तेव्हापासून पोलिस दिवसरात्र त्याची चौकशी करत आहेत. त्याला झोप येत असली तरी पोलीस जास्तीत जास्त माहिती काढून घेण्यासाठी त्याला जागं ठेवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी डॉ. कफील खान यांना अटक
नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसेची विचारसरणी एकच, राहुल गांधींचा घणाघात
'युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं'
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा; शेतकरी सन्मान निधीला लागणार कात्री?
आता कुणा 'दादा', 'काका'ला घाबरायचं कारण नाही; काकडेंची 'पवार'बाज फटकेबाजी