भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे; मणिशंकर अय्यर यांच्या व्हिडीओने वाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 06:00 AM2024-05-11T06:00:51+5:302024-05-11T06:01:09+5:30

भाजपचे टीकास्त्र, काँग्रेस वक्तव्याशी असहमत

India should respect Pakistan, they have nuclear bomb; Controversy with Mani Shankar Iyer's video | भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे; मणिशंकर अय्यर यांच्या व्हिडीओने वाद 

भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे; मणिशंकर अय्यर यांच्या व्हिडीओने वाद 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांची वादग्रस्त वक्यव्ये गाजत असताना मणिशंकर अय्यर यांनी भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहे हे आपण विसरता कामा नये, कोणी माथेफिरू सत्तेवर आला तर तो आपल्याविरुद्ध वापरू शकतो, अशी प्रतिक्रिया दिलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, भाजपने त्यावर टीका केली आहे. अय्यर यांच्या वक्तव्याशी पक्ष असहमत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.  एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहे
अय्यर म्हणाले, पाकिस्तानमध्ये दहशतवाद आहे, या कारणाखाली केंद्र सरकार पाकिस्तानशी चर्चा करणार नाही असे म्हणते, हे मला समजत नाही. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा भारत अहंकारातून आपल्याला जगात हिणवत आहे, असे पाकिस्तानला वाटेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील एखादा सत्ताधारी माथेफिरू हा बॉम्ब भारताविरुद्ध
वापरू शकतो. 

प्रचार मोहीम फसल्याने जुने व्हिडीओ काढत आहेत
पाकिस्तानबाबतचा व्हायरल झालेला व्हिडीओ जुना आहे आणि भाजपचा लोकसभेचा प्रचार फसल्यामुळे ते जुने व्हिडीओ काढत आहेत. व्हिडीओत मी घातलेल्या स्वेटरवरून हे स्पष्ट आहे की माझी टिपणी अनेक महिन्यांपूर्वी हिवाळ्यातली होती. भाजपच्या या खेळात मी पडणार नाही.
- मणिशंकर अय्यर, काँग्रेस नेते

जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न
जनतेचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी भाजपने अय्यर यांचा जुना व्हिडीओ व्हायरल केला. व्हिडीओत अय्यर कोणत्याही अधिकारांतर्गत पक्षाची भूमिका मांडत नव्हते. काही महिन्यांपूर्वी अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याशी काँग्रेस पूर्णपणे असहमत आहे. - पवन खेडा, काँग्रेस               प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष

ही विचारसरणी काँग्रेसची
हे तेच मणिशंकर अय्यर आहेत जे नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. २६/११ पुलवामा हल्ल्यांबाबत अनेक काँग्रेस नेते पाकला क्लीन चिट देत आहेत. त्यांच्यासाठी दहशतवाद्यांना पाठवणारा आदरणीय आहे, तर भारतीय लष्कर हे रस्त्यावरील गुंड आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे नेतेही पाकिस्तानबद्दल आदर दाखवत आहेत. ही विचारसरणी केवळ मणिशंकर अय्यर यांची नाही, तर संपूर्ण काँग्रेसची आहे. सध्याच्या निवडणुकांमध्ये व्होट बँकेसाठी हा एक प्रयोग आहे.
- शेहजाद पूनावाला, प्रवक्ते, भाजप

काँग्रेस पाकविरुद्ध मवाळ
भारताने पाकला घाबरावे आणि त्याचा आदर करावा, अशी अय्यर यांची इच्छा असल्याचे दिसते. परंतु नवा भारत कोणालाही घाबरत नाही. अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे हेतू, धोरणे आणि वैचारिकता उघड झाली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पाकिस्तान आणि त्यांच्या भूमीवर वाढणाऱ्या दहशतवादापुढे शरणागती पत्करली आहे. 
- राजीव चंद्रशेखर, केंद्रीय मंत्री

Web Title: India should respect Pakistan, they have nuclear bomb; Controversy with Mani Shankar Iyer's video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.