शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

Narendra Modi : "भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा, शक्य ती सर्व मदत करण्यास तयार"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 11:43 AM

Narendra Modi And Nepal Earthquake : नेपाळमधील आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने 132 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रुकुम पश्चिम डीएसपी नामराज भट्टराई यांनी पुष्टी केली की पहाटे 5 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) गोळा केलेल्या आकडेवारीनुसार 36 मृत्यूची नोंद झाली आहे. जजरकोटचे डीएसपी संतोष रोक्का यांनी सांगितले की, भूकंपात 34 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर इतर ठिकाणीही माणसांचा मृत्यू झाला आहेत. 

जजरकोट आणि रुकुम हे पश्चिम नेपाळमधील भूकंपग्रस्त भाग आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आणि ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नेपाळमधील या आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीमुळे आपण अत्यंत दु:खी आहोत. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि आम्ही जखमींना लवकरात लवकर बरे व्हावं यासाठी प्रार्थना करतो" असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी नोंदवण्यात आली आणि भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये 10 किमी आत होते. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहारसह उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

नेपाळपासून दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के 

नोएडा, एनसीआरमध्ये भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. बिहारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर बिहारची राजधानी पाटणामध्ये लोक घराबाहेर पडले. पाटणा येथील एका व्यक्तीने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, अचानक त्याचा बेड आणि पंखा हालू लागला. भूकंप झाल्याचे लक्षात येताच ते तात्काळ घराबाहेर पडले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळEarthquakeभूकंप