नवी दिल्ली: चीनसोबतचा सीमा वाद वाढत असताना, पूर्व लडाखमधील तणाव कायम असताना भारतानं शस्त्रसज्जतेवर भर दिला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय हवाई दलात राफेल विमानं दाखल झाली. यानंतर आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसची आधुनिक आवृत्ती आहे. त्याची मारक क्षमता ४०० किलोमीटर इतकी आहे. पीजे-१० प्रकल्पाच्या अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याची माहिती डीआरडीओनं दिली. ओदिशातल्या चांदिपूरमध्ये ब्रह्मोसची चाचणी घेण्यात आली. यामुळे भारतीय सैन्याचं सामर्थ्य आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात करण्यात आली आहे. क्षेपणास्त्राची एअरफ्रेम आणि बूस्टर भारतातच तयार करण्यात आलं आहे.
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; ४०० किमीपर्यंत करणार वार
By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 4:14 PM