नवी दिल्लीः चीन आणि पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना आवाक्यात घेण्याची क्षमता असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाइलची भारताकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. भारतानं आण्विक हल्ला करण्यात सक्षम असलेल्या बॅलिस्टिक मिसाइलचं यशस्वी परीक्षण केलं. ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर 3500 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी घेण्यात आली.या पाणबुडी मिसाइलला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे(DRDO)नं तयार केलं आहे. या मिसाइलला भारतीय नौसेना स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत-श्रेणीच्या पाणबुडीत तैनात करणार आहे. ही मिसाइल जमिनीपासून हवेत मारा करून लक्ष्य भेदण्यात सक्षम आहे. QRSAM यंत्रणेंतर्गत कोणत्याही सैन्य अभियानांतर्गत मिसाइल गतिमान राहते. तसेच शत्रूचं विमान किंवा ड्रोनवर नजर ठेवून तात्काळ त्याला लक्ष्य बनवते.
3500 किलोमीटर दूरवर हवेतच नेस्तनाबूत होणार शत्रूचं विमान, K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 8:59 AM