नवी दिल्ली: भारतीय लष्कराची ताकत आता आणखी वाढणार आहे. कारण, आज(बुधवार) भारताने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 'प्रलय' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र 150 ते 500 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ही चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 10.30 वाजता प्रक्षेपित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने मोहिमेतील सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ट्रॅकिंग उपकरणांच्या बॅटरीने किनारपट्टीवर प्रक्षेपणाचे निरीक्षण केले. प्रलय हे 500-1,000 किलोग्रॅम पेलोड क्षमतेचे क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे रणांगणात शत्रूचा नाश करण्यासाठी याचा खूप उपयोग होईल.
चिनी क्षेपणास्त्रांचा सामना करण्यास सक्षम
सूत्रांचे म्हणणे आहे की, या क्षेपणास्त्राचा उल्लेख डीआरडीओने 2015 साली केला होता. वार्षिक अहवालात सांगितले होते की, हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एक सर्वनाश आहे, जे चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीसह कन्सटरमधूनही डागता येते. या क्षेपणास्त्राची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ते इतर कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपेक्षा कितीतरी जास्त प्राणघातक आहे. त्याच्या लक्ष्यावर अचूक मारा करण्याची तसेच ते नष्ट करण्याची क्षमता यात आहे.
अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज
प्रलय क्षेपणास्त्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. या काळातील ही सर्वात मोठी मागणी आहे. अलीकडे चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांनी अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. पण हे देश भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमालाही विरोध करतात. अशा परिस्थितीत भारताने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून शत्रूच्या कोणत्याही प्रकारच्या धोक्याला तोंड देण्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवता येईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केले
या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि त्याच्याशी संबंधित टीमचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, 'पहिल्या विकास उड्डाण चाचणीसाठी DRDO आणि संबंधित टीम्सचे अभिनंदन. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मी त्यांचे कौतुक करतो. आज एक महत्त्वाचा टप्पा आगाठला गेला आहे.