शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

भारताला जपानचा डोकलामसाठी पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:05 AM

चीनशी गेल्या दोन महिन्यांपासून सिक्कीमनजीक डोकलाम येथे सुरू असलेल्या वादात जपानने भारताची पूर्ण पाठराखण केली आहे.

नवी दिल्ली : चीनशी गेल्या दोन महिन्यांपासून सिक्कीमनजीक डोकलाम येथे सुरू असलेल्या वादात जपानने भारताची पूर्ण पाठराखण केली आहे. मूळ स्थिती बळाचा वापर करून एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न व्हायला नको, असे जपानने म्हटले.डोकलाम वादावर भारताला प्रथमच एका मोठ्या देशाने नि:संदिग्ध पाठिंबा जाहीर केला आहे. चीन आणि भूतान यांच्यातील तो भाग वादग्रस्त असल्याची आम्हाला कल्पना आहे व दोन्ही देशांनी वाद असल्याचे मान्यही केले आहे, असे जपानचे राजदूत केनजी हिरामात्सू यांनी गुरुवारी येथे सांगितले.हिरामात्सू म्हणाले की, वादग्रस्त भागाशी संबंधित सगळ््या पक्षांनी मूळ स्थिती बळाचा वापर करून एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न न करणे महत्त्वाचे आहे. वाद शांततेच्या मार्गांनीच सोडविला जावा.डोकलाम वादावर दोन्ही बाजूंना स्वीकारार्ह होईल, असा शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत सातत्याने राजनैतिक मार्गांनी प्रयत्न करीत आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आधीच स्पष्ट केले आहे व ही भूमिका शांततापूर्ण तोडग्यासाठी महत्त्वाची असल्याचे आम्ही समजतो.>करारामुळे भारत गुंतलाडोकलाम वादाचा परिणाम संपूर्ण विभागावर होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे जपानचे अतिशय बारकाईने लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताच्या भूमिकेबद्दल हिरामात्सू म्हणाले की, भारत या वादात भूतानशी त्याच्या असलेल्या द्विपक्षीय करारांमुळे गुंतला असल्याची आम्हाला माहिती आहे.