शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Population: भारत १,४२,८६,००,०००, लोकसंख्येत चीनला टाकले मागे; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 7:51 AM

Population: कित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे.

नवी दिल्ली : कित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली, तर  चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या दर्शकानुसार ही बाब स्पष्ट झाली. १९५० पासून जागतिक स्तरावर लोकसंख्येची आकडेवारी गोळा केली जात आहे. पहिल्यांदाच भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

संयुक्त राष्ट्र जागतिक लोकसंख्या पुस्तिका २०२२ नुसार, भारताची लोकसंख्या २०५० पर्यंत १६६.८ कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, तर चीनची लोकसंख्या १३१.७ कोटींपर्यंत घसरू शकते. अहवालानुसार, जागतिक लोकसंख्या १९५० नंतर सर्वांत कमी वेगाने वाढत आहे, २०२० मध्ये ती एक टक्क्यांहून कमी वेगाने वाढली. गेल्या वर्षी भारताची लोकसंख्या १४१.२ कोटी होती, तर चीनची लोकसंख्या १४२.६ कोटी होती. १५ नोव्हेंबर रोजी जागतिक लोकसंख्या आठ अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)

यूपी-बिहार तरुण; केरळ, पंजाब ‘वृद्ध’तज्ञांच्या मते, भारताची लोकसंख्या राज्यानुसार भिन्न आहे. केरळ आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्ध लोकसंख्या आहे, तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे.

लोकसंख्येची वयोगटांनुसार विभागणीसंयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए)च्या नवीन अहवालानुसार, भारतातील ०-१४ वयोगटातील     २५% १० ते १९ वयोगटातील     १८%१० ते २४ वयोगटातील     २६%१५ ते ६४ वयोगटातील     ६८%लोकसंख्येपैकी सात टक्के लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

तीन दशकांनंतर लोकसंख्या घटण्याची शक्यतापुढील तीन दशकांपर्यंत देशाची लोकसंख्या वाढू शकते आणि त्यानंतर ती घटायला सुरुवात होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.

२५.४कोटी तरुणांची संख्यायूएनएफपीएच्या भारताचे प्रतिनिधी आणि भूतानच्या ‘कंट्री डायरेक्ट’ आंद्रिया वोजनर म्हणाल्या, ‘भारताच्या १.४ अब्ज लोकांकडे १.४ अब्ज संधी म्हणून पाहिले पाहिजे. देशाची २५.४ कोटी लोकसंख्या ही तरुणांची आहे (१५ ते २४ वयोगटातील). 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय