नवी दिल्ली : भारत सरकार फायझरच्या कोरोना लसीचे ५० दशलक्ष डोस (50 Million Doses) खरेदी करण्यासाठी चर्चा करीत आहे. वॉल स्ट्रीट जनरल या अमेरिकन वृत्तपत्राने त्यावर एक अहवाल प्रकाशित केला आहे. ही लस अमेरिकेची फार्मा कंपनी Pfizer Inc आणि जर्मन कंपनी BioNTech यांनी विकसित केली आहे. मात्र आरोग्य मंत्रालय आणि Pfizer यांनी या संदर्भात कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला आहे.
औषध कंपनीने अद्याप भारतात आपली लस वापरण्याची परवानगी मागितली नाही. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालवणारा भारत आतापर्यंत प्रामुख्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि इंडिया बायोटेकच्या लसीद्वारे नागरिकांचे लसीकरण करत आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनसोबत चर्चा वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालात असेही म्हटले आहे की, सरकार जॉन्सन अँड जॉन्सनसोबत सुद्धा चर्चा करीत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनचा भारतातील बायोलॉजिक ई सोबत ६० कोटी डोस तयार करण्यासाठी उत्पादन करार आहे.
सिंगल शॉट लसीला भारतात परवानगी गेल्या आठवड्यात देशात जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला भारतात आणीबाणी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देशात ५ लसी आहेत. एसआयआय, भारत बायोटेक, स्पुतनिक आणि मॉडर्ना यांना सध्या भारतात परवानगी आहे.
डेल्टा व्हेरिएंटचा कहरकोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने सध्या जगभरात कहर केला आहे. काही महिन्यांपूर्वी सर्व निर्बंध उठविणाऱ्या देशांना आता पुन्हा एकदा निर्बंध लागू करावे लागत आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेला अमेरिकेत गेल्या ६ महिन्यांत सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. मंगळवारी चीनमध्ये मोठ्या संख्येने नवीन प्रकरणे आली आहेत. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामध्येही नवीन प्रकरणांची संख्या अचानक वाढली आहे.