शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भारत सहिष्णूच

By admin | Published: January 29, 2016 12:42 AM

मी भारतीय आहे. त्यामुळे मी (एकाच वेळी) हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्धही आहे. कलाकारांना कोणताही धर्म नसतो व माझ्यापुरते सांगायचे तर संगीत हाच माझा धर्म आहे, असे विख्यात

तिरुवनंतपूरम : मी भारतीय आहे. त्यामुळे मी (एकाच वेळी) हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्धही आहे. कलाकारांना कोणताही धर्म नसतो व माझ्यापुरते सांगायचे तर संगीत हाच माझा धर्म आहे, असे विख्यात तबलापटू उस्ताद झाकीर हुसैन यांनी येथे सांगितले.उस्ताद झाकीर हुसैन यांचा शशांक सुब्रमण्यम व राकेश चौरासिया या पट्टीच्या बासरीवादकांसोबत जुगलबंदीचा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम बुधवारी झाला. त्याआधी पत्रकारांशी बोलताना झाकीर हुसैन यांनी अनेक विषयांवर आपली सडेतोड मते व्यक्त केली.असहिष्णुतेवरील चर्चेविषयी विचारता वरीलप्रमाणे मत व्यक्त करताना झाकीर हुसैन म्हणाले की, कदाचित काही राजकारण्यांना काही तरी गडबड असल्याचे प्रामाणिकपणे वाटत असावे. म्हणून त्यांच्यासाठी अहिष्णुतेचा विषय ठळकपणे मांडणे महत्वाचे असू शकते. पण मला तसे वाटत नाही. माझ्या मते भारत हा खूपच सहिष्णू देश आहे. मी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्धही आहे, कारण मी भारतीय आहे. स्त्रिया तिथे जाऊ शकतात का? या प्रश्नावर वर झाकीर हुसैन म्हणाले की, एक हजार महिलांनी एकाच वेळी शबरीमला येथे जाण्याचे मनावर घेतले तर त्या तेथील मंदिरातही प्रवेश करू शकतात.संगीताची जातकुळी एकचझाकीर हुसैन म्हणाले, कर्नाटकी आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत परस्परांशी मेळ खात नाही हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे. संगीत, मग ते हिंदुस्तानी असो वा कर्नाटकी, ते सात सुरांवरच आधारलेले असते. दोन्हींचा पाया एकच आहे. संगीतात भेदभाव करायचा, हा विरोधाभास आहे.(वृत्तसंस्था)मी स्वत:ला सर्वोत्तम तबलापटू कधीच मानत नाही. देशातील १५-२० उत्तम तबलापटूंपैकी मी एक आहे. ज्या एखाद्या दिवशी भट्टी जमते तेव्हा इतरही माझ्यापेक्षा सरस ठरतात.