शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने असा शिकवला धडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 1:35 PM

गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यत्वासाठी झालेल्या निवडणुकीत भारताने मालदीवऐवजी इंडोनेशियाला मत दिले. तसेच हिंदी महासागरातील आपल्या शेजारी देशाला अधिक मते मिळणार नाहीत, याची खबरदारी घेतल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत भारताने आपल्यालाच मतदान केल्याचा दावा मालदीवकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात  भारताने इंडोनेशियाला मदत केल्याचे राजकीय सूत्रांनी म्हटले आहे. भारताने केलेल्या मदतीमुळे स्थायी समितीच्या हंगामी सदस्यत्वाच्या निवडणुकीत आशिया-पॅसिफिक विभागातून इंडोनेशियाने मोठ्या फरकाने विजय मिळवला.  8 जूनला झालेल्या या निवडणुकीत इंडोनेशियाच्या बाजूने 144 देशांनी मतदान केले. तर मालदिवला केवळ 46 देशांनी पाठिंबा दिला. भारताने इंडोनेशियाला मतदान करण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक देशांनी मालदीवला मतदान न करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे 60 देशांचा लेखी पाठिंबा असून 30 हून अधिक देशांनी तोंडी समर्थन दिल्याचा दावा मालदिवने केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना फारच कमी मते मिळाली. भारत आणि मालदीवमधील राजकीय संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण बनले आहेत. त्यातच मालदीव सरकारकडून विविध मुद्द्यांवर भारताला डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे  भारताने उचललेले हे पाऊल म्हणजे भारतीय हितसंबंधांविरुद्ध भूमिका घेणाऱ्या मालदिवविरोधातील पहिली दंडात्मक कारवाई मानली जात आहे. राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या कारकीर्दीत हिंदी महासागरामध्ये मालदीव हा भारताच्या संरक्षण हितसंबंधांच्या विरोधात काम करत आहे. तसेच भारताने दिलेले दोन हेलिकॉप्टरही जूव महिन्याच्या अखेरीपर्यंत परत घेऊन जाण्याचे निर्देश मालदीवने दिले होते. तसेच भारतीयांना देण्यात येणाऱ्या काम करण्याच्या परवान्यांना स्थगिती देण्याचे आदेशही आपल्या अधिकाऱ्यांना दिले होते. गेल्याच आठवड्यात भारताने मालदीवमधील राजकीय परिस्थितीबाबतचे आपले मौन सोडताना कोणतीही सुनावणी न करता राजकीय कैद्यांना शिक्षा सुनावल्याने यामीन सरकारवर टीका केली होती.   

टॅग्स :IndiaभारतMaldivesमालदीवunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ