भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना चेन्नईमध्ये खेळवला जात आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना एक अजब घटना घडली. त्यामुळे बराच वेळ खेळ थांबवावा लागला. जेव्हा खेळ थांबला तेव्हा सर्व खेळाडूंना हसू आवरता आलं नाही.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना डावातील ४३ व्या षटकात ही घटना घडली. कुलदीप यादव हे षटक टाकत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सीन अबॉटने चौकार ठोकला. तेवढ्यात मैदानात एका कुत्र्याची एंट्री झाली. त्यामुळे थोड्या वेळासाठी खेळ थांबवावा लागला. त्यानंतर मैदानावरील कर्मचारी त्या कुत्र्याच्या मागून धावताना दिसले. हे सर्व होत असताना कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि इतर खेळाडूंना हसू आवरले नाही.
मात्र हा कुत्रा कुठून आला हे समजले नाही. मात्र या प्रकाराचा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला. एवढंच नाही तर तो कुत्रा बराच वैळ मैदानात पळत होता. तर सुरक्षा रक्षक त्याच्यामागे पळत होते. जेव्हा कुत्रा बाहेर जाईपर्यंत खेळ खोळंबून राहिला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.