ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेशी संबंधित असलेल्या कॅबिनेट कमिटीची बैठक सुरु आहे. नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे.
त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून, भारत सरकार २००३ साली पाकिस्तान बरोबर झालेला शस्त्रसंधी करार मोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री पाकिस्तानी लष्कराने पूँछ जिल्ह्यातील भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
आणखी वाचा
उरी हल्ल्यानंतर दोनच दिवसांनी पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. वारंवार होणा-या या शस्त्रसंधी उल्लंघनासंबंधी मोठा निर्ण होण्याची शक्यता आहे.
(व्यंगचित्रकार - संदीप प्रधान, असिस्टंट एडिटर, लोकमत)