नवी दिल्ली - भारताला पुढच्या वर्षी मे महिन्यात वायुदलाच्या ताफ्यात तैनात होणाऱ्या ४ राफेल लढाऊ विमानांची ताकद आता अधिक बळकट होणार आहे. पाकिस्तान या शत्रू देशासाठी ही विमानं खतरनाक ठरणार आहे. फ्रान्सकडून मिळणाऱ्या विमानांमध्ये मिटिऑर मिसाइल्स बसवली जाणार आहेत. या मिसाईल्सचे वैशिट्य असे की, हवेतून हवेत मारा करणाऱ्या या मिसाईल्स १२० ते १५० किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्य भेदू शकतात. हे मिसाईल इतकी मारक आहे की या मिसाईलला 'नो स्केप' देखील म्हणतात.
राफेलमध्ये ही मिसाईल्स तैनात केल्याने भारताला प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान आणि चीन या देशांशी हवाई हल्ल्यादरम्यान भारताची निर्णायक क्षमता वाढू शकते. अशाप्रकारे भारताने कोणताही हल्ला नेस्तनाबूत करण्याची क्षमता प्राप्त करू शकते.राफेलमध्ये तैनात करण्यात येणाऱ्या या मिसाईलची काय वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेऊया!* हे मिसाईल पाकिस्तानच्या AIM-120Cला मागे टाकेल, पाकिस्तानच्या AIM-120Cची क्षमता १०० किलोमीटरपर्यंत दूरपर्यंत लक्ष्य भेदण्याइतकी आहे. पाकिस्तानने बालाकोट एयरस्ट्राइकनंतर भारतीय सीमेवर पाठवलेल्या एफ - १६ जेटवर या मिसाईलचा वापर केला होता.* मिटिऑर मिसाइल्सला बीव्हीआर यानी बियॉन्ड विजुअल रेंड मिसाइल देखील म्हणतात. ही मिसाईल्स २०२० वर्षाच्या अखेरीस ताफ्यात तैनात होणार होती. मात्र, आता मे २०२० मध्ये ४ राफेल जेटसह ताफ्यात सामील होणार आहे.* हे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर-टू-एयर मिसाईल्सची पुढच्या पिढीच्यापार्श्वभूमीवर तयार करण्यात आले आहे. ही मिसाईल्स आतापर्यंतचा सर्वात आधुनिक आणि मारक मिसाईल्समधील एक असल्याचे मानले जाते.
*हे मिसाईल कोणत्याही ऋतूत (मोसम) आणि कोणत्याची प्रकारचे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे. १९० किलोग्रॅम वजन आणि ३.७ मीटर लांब असं हे मिसाईल आहे.