नवी दिल्ली : सीमेपलीकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन यापुढे खपवून घेतले जाणार नाही़ या कुरापती थांबवा अन्यथा भारताचे उत्तर महागात पडेल, असा सज्जड दम संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिला आहे़ सीमेवर पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा भडिमार सुरू झाल्यानंतरची भारताची ही सर्वांत कठोर प्रतिक्रिया मानली जात आहे़जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. बुधवारी रात्रभर पाक रेंजर्सनी जम्मू, सांबा व कठुआ जिल्ह्यांतील ६० चौक्या व १३० गावांना लक्ष्य करीत गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला़ यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तीन जवानांसह बारा जण जखमी झाले़ गुरुवारी सकाळपर्यंत हा भडिमार सुरू होता़ भारतीय जवानांनीही याचे चोख प्रत्युत्तर दिल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले़
भारताचे उत्तर पाकला महागात पडेल
By admin | Published: October 10, 2014 6:05 AM