नवी दिल्ली - भारतासह जगभरातील बलाढ्य देश चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे त्रस्त आहेत. कोरोना बाधित आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच वृत्त आहे की, कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतचीनकडून व्हेंटीलेटर, मास्क आणि आय गियर सारखे पर्सनल प्रोटेक्टीव्ह साहित्य (पीपीई) खऱेदी करणार आहे. यात टेस्टींग किटचा समावेश करण्यात आलेला नाही. या संदर्भात सरकारने माहिती दिली आहे. अनेक देशांकडून चीनच्या टेस्टींग किटच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे.
सरकार खरेदीसाठी चायनीज कंपन्यांशी डील करणार आहे. सुत्रांनी सांगितल्यानुसार, भारत चीनकडून टेस्टींग किट खरेदी करणार नाही. चीनने स्पेन, चेक प्रजासत्ताक आणि तुर्कीला टेस्टींग किटची निर्यात केली होती. मात्र या कीटमध्ये दोष आढळून आला होता. तर फिलीपाईन्सने या कीटची तक्रार केली होती.
भारतात सध्या कोरोना व्हायरस बाधितांची संख्या १४४० वर पोहोचली आहे. तर अनेकांच्या मते हा आकडा १६०० च्या पुढे आहे. कोरोनामुळे आतापर्तंत ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात इतर देशांप्रमाणे कोरोना पसरला तर मोठे नुकसान होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतील आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे. त्यामुळे आधीच उपाययोजना करण्यावर भारताचा भर आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, भारत चीनकडून तत्काळ एन-९५ मास्क आणि व्हेंटीलेटर खरेदी करण्यासाठी सकारात्मक आहे. चीनकडून खरेदी केल्याने भारतावरील दबाव कमी होऊ शकतो. एन-९५ आणि पीपीईचे उत्पादन भारतात करण्यावर बंधने आली आहे. कारण यासाठी लागणारे साहित्य चीन आणि दक्षिण कोरिया येथून आयात करण्यात येते. मात्र ही आयात सध्या बंद आहे.