शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

UAEला खाद्य पुरवठा करण्यासाठी भारत करणार विशेष शेतांची निर्मिती

By admin | Published: March 06, 2017 7:37 AM

भारत संयुक्त अरब आमिराती(यूएई)साठी विशेष अशा शेतांची निर्मिती करणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - भारत आणि संयुक्त अरब आमिराती(यूएई)चे संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत. ऊर्जा क्षेत्रात सुरक्षेसाठी भारताच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यूएईनं उचललेल्या पावलाची सकारात्मक पद्धतीनं भारत परतफेड करण्याच्या तयारीत आहे. भारत संयुक्त अरब आमिराती(यूएई)साठी विशेष अशा शेतांची निर्मिती करणार आहे. यासाठी दोन्ही देश एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहेत. अबूधाबीचे शहजाद्यांनी भारताचा दौरा केल्यानंतर दोन्ही देशांनी हा विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015मध्ये अबूधाबीमध्ये जाऊन यूएईसोबत काही करार केले होते. त्यानुसारच जानेवारी 2017मध्ये हा प्रकल्प करण्यावर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अमर सिन्हा म्हणाले, यूएईशी झालेल्या करारांनुसार भारताचे फार्म टू पोर्ट या प्रकल्पावर काम सुरू आहे. या प्रकल्पाकडे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून पाहिलं जाणार आहे. मात्र यात कॉर्परटाइज्ड शेती करणा-यावर भर दिला जाणार आहे. या शेतात यूएईच्या बाजारांवर लक्ष केंद्रित करून शेती करण्यात येणार आहे. तसेच या शेतात पिकवलेला माल लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून निर्यात करण्यात येणार आहे. दरम्यान, या संकल्पनेला दोन्ही देशांनी स्वीकारलं असून, या विशेष शेतात पिकवण्यात येणा-या अन्नधान्यावर भारताचा खाद्य सुरक्षा कायदा लागू होणार नाही. जर हा प्रकल्प यशस्वी झाला, तर दोन्ही देशांसाठी कृषी उद्योगात एक नवं सेक्टर तयार होईल. तसेच आम्ही आमच्या कौशल्य, भांडवल, तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागीदार कंपन्यांसोबत उत्पादन वाढवण्यासाठी वापर करणार आहोत. उदा. राफेल विमानं दोन्ही देशांनी विकत घेतली आहेत. त्यामुळे त्याचे भाग आणि उपकरण बनवण्यासाठी दोन्ही देश मिळून प्रयत्न करणार आहेत. याचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही देशांच्या समित्यांची लवकरच बैठक होईल. मात्र दोन्ही देशांमध्ये असलेल्या कठोर निर्बंधांमुळे हे वाटतं तितकं सोपंही नाही, असंही अमर सिन्हा म्हणाले आहेत. तसेच भारत आणि यूएई हे दोन्ही देश सुरक्षेसाठी एकमेकांचं सहकार्य करत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.