चंदिगड - युद्धभूमीपासून दुर्गम प्रदेशापर्यंत सहजपणे हालचाली करण्यासाठी आणि अवजड हत्यारांची ने आण करण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या चिनूक हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता सर्वश्रुत आहे. दरम्यान, अशी ही शक्तिशाली चिनूक हेलिकॉप्टर्स आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. भारतीय हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत चंदिगड एअरबेसवर चार चिनूक हेलिकॉप्टर्सचे युनिट हवाई दलात दाखल करून घेण्याता आले. यावेळी चिनूक हेलकॉप्टर्सची मारक क्षमता देशासाठी मोठा ठेवा असून, आजचा दिवस हा भारती हवाई दलाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस आहे. असे हवाई दल प्रमुख धनोआ यांनी म्हटले आहे. चिनूक हे महाकाय हेलिकॉप्टर सुमारे 9.6 टन वजनाचे सामाना वाहून नेऊ शकते. वजनदार साहित्य, बंदुका तसेच शस्त्रसज्ज वाहने या हेलिकॉप्टरमधून वाहून नेता येतात. दुर्गम पर्वतीय विभागातील मोहिमांमध्ये ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात. लष्करी हालचालींसोबतच आपत्तीच्या प्रसंगी मदत आणि बचाव कार्यामध्येही ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात.
नाद करायचा नाय... 'एअर स्ट्राईक' करणाऱ्या भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:49 PM