भिंड: भारतीय वायुसेनेच्या(IAF) विमानाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाचे मिराज 2000 विमान गुरुवारी मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील बाबडी गावात कोसळले. दरम्यान, विमानाचा पायलट सुरक्षित आहे. ग्रामस्थांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय हवाई दलाचे विमान Indian Air Forceमध्य प्रदेशातीलMadhya Pradesh भिंड Bhind परिसरात कोसळले. भिंडपासून सुमारे 6 किमी अंतरावर असलेल्या माणकाबाद येथील बाजरीच्या शेतात हे विमान कोसळले आहे. एक प्रशिक्षणार्थी वैमानिक विमान उडवत होता, पण या घटनेतून तो सुरक्षित वाचला आहे. घटनेची माहिती मिळथाच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
फ्लाइट लेफ्टनंट अभिलाष असे वैमानिकाचे नाव आहे. भारतीय हवाई दलानेही ट्विट करुन या अपघाताची माहिती दिली आहे. तसेच या अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. "आयएएफच्या मिराज 2000 विमानात आज सकाळी एका प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. विमान शेताक कोसळले असून, अपघातात पायलट सुखरूप आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,"अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी बाडमेरमध्ये विमान अपघात झाला होता
25 ऑगस्ट रोजी भारतीय वायुसेनेचे मिग -21 विमान राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील भूटारिया गावाजवळ कोसळले होते. त्या अपघातातही वैमानिक सुरक्षित होता. तसेच, इथर कोणालाही कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नव्हती. नियमित उड्डाणावर असताना मिगचा अपघात झाला होता.