नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकचा प्रमोशनल व्हिडीओ भारतीय हवाई दलानं प्रसिद्ध केला आहे. हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांनी हवाई दल दिनाच्या निमित्तानं बालाकोटवरील कारवाईचा व्हिडीओ जारी केला. फेब्रुवारी महिन्यात भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी हवाई तळ उद्ध्वस्त केले होते.हवाई दलानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये आकाशाकडे झेपावणारी हवाई दलाची लढाऊ विमानं, त्यांनी केलेली बॉम्बफेक, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ अशी दृश्यं दिसत आहेत. मात्र भारतीय हवाई दलानं हा व्हिडीओ प्रमोशनल म्हणून प्रसिद्ध केल्यानं व्हिडीओतील दृश्यं प्रत्यक्ष बालाकोट एअर स्ट्राइकचीच आहेत की प्रतिमात्मक स्वरुपात हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
वायुसेनेला सलाम... बालकोटचं शौर्य आणि 'अभिनंदनीय' पराक्रमाचा व्हिडीओ प्रसिद्ध!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 1:09 PM