नवी दिल्ली - भारताने संरक्षण खात्याअंतर्गत इस्रायलसोबत नवीन करार केला आहे. भारतीय वायू सेना इस्रायलकडून 300 कोटी रुपयांचे 100 बॉम्ब खरेदी करणार आहे. पुढील तीन महिन्यात हे 100 स्पाईस बॉम्ब भारतीय वायुसेनेच्या दलात दाखल होतील. भारतीय वायूसेनेकडून पाकिस्तानच्या बालाकोट प्रांतातील हवाई हल्ल्यांमध्ये हेच स्पाईस बॉम्ब वापरण्यात आले होते.
भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याचा बदल घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालोकोटमध्ये हवाई हल्ला चढवला होता. या हल्ल्यावेळी भारताने 1000 किलोंचे स्पाईस बॉम्ब जैश ए मोहम्मद संघटनेच्या दहशतवादी तळांवर टाकले होते. त्यामध्ये शेकडो दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. आता, इस्राईलकडून 300 कोटी किमतीचे आणखी 100 बॉम्ब भारत खरेदी करणार आहे.