जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय वायुसेनेनं आज 'एअर स्ट्राइक'नं घेतला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये १००० किलोचे बॉम्ब टाकून भारताने २५० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या धडाकेबाज कामगिरीनंतर, राजस्थानातील चुरू इथल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशरक्षणाची शपथ घेतली. देश सुरक्षित हातांमध्ये आहे, असं ठामपणे सांगत त्यांनी मतदारांना 'मिशन २०१९' साठी सादही घातली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये एका कवितेतून देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तीच कविता त्यांनी आज पुन्हा सादर केली. 'देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं रुकने दूंगा' अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली आणि वीर जवानांना मानाचा मुजरा केला.
नरेंद्र मोदींनी सादर केलेली कविता अशीः
सौंगध मुझे इस मिट्टी कीमैं देश नही मिटने दूंगामै देश नही रुकने दूंगामै देश नही झुकने दूंगा
सौंगध मुझे इस मिट्टी की...
मेरा वचन है भारत मां को तेरा शीश झुकने नही दूंगासौंगध मुझे इस मिट्टी कीमै देश नहीं मिटने दूंगा
सौंगध मुझे इस मिट्टी की...
जाग रहा है देश मेराहर भारतवासी जितेगासौंगध मुझे इस मिट्टीमै देश नहीं मिटने दूंगा
सौंगध मुझे इस मिट्टी की...
हमे फिर से दोहराना है और खुद को याद दिलाना हैन भटकेंगे, न अटकेंगेकुछ भी हो हम देश नहीं मिटने देंगे
सौंगध मुझे इस मिट्टीमै देश नहीं मिटने दूंगा ।।