नवी दिल्ली: भारतीय सुरक्षा दलांनी अंदमान निकोबार बेटांवर पॅरा-ड्रॉप ऑपरेशन केलं. याला 'बुलस्ट्राइक' असं नाव देण्यात आलं होतं. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानं यात सहभाग घेतला होता. 9 मे रोजी सुरक्षा दलांनी तेरेसा बेटावर केलेल्या या सरावाचा व्हिडीओ भारतीय हवाई दलानं शेअर केला आहे. ऑपरेशन बुलस्ट्राइकमध्ये सुरक्षा दलांचे एकूण 170 जवान सहभागी झाले होते. यात लष्कराच्या 149, हवाई दलाच्या 12 आणि नौदलाच्या 9 स्कायडायव्हर्सचा समावेश होता. या डायव्हर्सनी विमानातून उड्या घेत ऑपरेशन यशस्वी केलं. तिन्ही सुरक्षा दलांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईचं सामर्थ्य दाखवण्यासाठी हा सराव करण्यात आला. हवाई दलानं या सरावाचा चित्तथरारक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिन्ही दलांचे जवान हवाई दलाच्या सी-130J विमानातून झेपावताना दिसत आहेत.
VIDEO: भारतीय सुरक्षा दलांचा 'बुलस्ट्राइक'; ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 8:43 PM