Indian Army Chief to Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच भारत-चीन संबंधांवर भाष्य करताना, भारतीय सैन्यावर टिप्पणी केली होती. आता लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राहुल गांधींना सल्ला देत, भारतीय सैन्याला राजकारणात ओढू नये, असे म्हटले आहे.
एएनआयला पॉडकास्टमध्ये बोलताना लष्करप्रमुख म्हणाले की, आम्ही चीनसोबत संवादाचा मार्ग पुढे नेला आहे. चीनसोबतच्या सीमावादावर चर्चेला प्रोत्साहन दिले आहे. एकमेकांशी बोललो तर अनेक शंका दूर होतील. आमचे मत असे आहे की, कोणत्याही आवश्यक मार्गाने शंका दूर केल्या पाहिजेत. यासाठी आम्ही कोअर कमांडर्सना शक्य असेल तेथे निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. चर्चेतून कोणताही प्रश्न सोडवता येत असेल तर तो केला पाहिजे. त्यांच्या स्तरावर कोणतेही प्रकरण सोडवता येत असेल तर त्यांनी ते करावे, असा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मंजुरीची वाट पाहण्याची गरज नाही.
राहुल गांधींना सल्लाराहुल गांधींनी दावा केला होता की, लडाख सेक्टरमध्ये चीनकडून घुसखोरी सुरू आहे. या दाव्यावरही जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भाष्य केले. लष्कराला राजकारणात ओढू नये, असा सल्ला त्यांनी राहुल गांधींना दिला. तसेच, आम्हाला संवाद हवा आहे. पण जेव्हा गरज असेल, तेव्हा आम्ही युद्धातून मागे हटणार नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.