शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
2
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
3
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
4
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
5
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
6
NPS Vatsalya: दर महिन्याला ₹१००० गुंतवा, मुलांच्या रिटायरमेंटला मिळतील ₹३.८ कोटी; दीड लाखांचं पेन्शनही
7
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
8
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
9
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
10
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
11
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
12
स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."
13
अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा
14
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
15
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
16
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
17
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
18
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
20
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार

"पोलीस तुमचे बाप आहेत"; लष्कराच्या जवानाला निर्वस्त्र करुन बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 9:02 PM

राजस्थानमध्ये पोलिसांनी भारतीय लष्कराच्या जवालाना निर्वस्त्र करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Rajasthan Police : भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शत्रूंना रोखून धरत सडेतोड प्रत्युत्तर देत असतात. मात्र घरी आल्यानंतर त्यांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळते. असाच एक प्रकार राजस्थानच्या जयपूरमधून समोर आला आहे. जयपूरमधील शिप्रापथ पोलीस ठाण्यात पोलिसांनी लष्कराच्या कमांडोला विवस्त्र करून काठीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी शिप्रा पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. जेव्हा पोलिस लष्कराच्या जवानांशी असे वागतात, तेव्हा सर्वसामान्यांना कसं वागवेल जात असेल असा सवाल आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केला.

जयपूरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानावर हल्ला केल्याचा आरोप जयपूर पोलिसांवर आहे. शिप्रापथ पोलीस ठाण्यात लष्कराच्या जवानाला विवस्त्र करून मारहाण करून आरोपींमध्ये बसवल्याचा आरोप आहे. एवढ्यावच न थांबता त्यांनी पोलीस हा लष्कराचा बाप आहे, असे देखील म्हटलं. आदल्या दिवशी खरं  पोलिसांनी हुक्का बारवर छापा टाकून लष्कराच्या एका जवानाला ताब्यात घेतले होते. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले लष्कराचे शिपाई अरविंद सिंग हे ताब्यात घेतलेल्या सैनिकाची माहिती घेण्यासाठी शिप्रापथ पोलीस ठाण्यात पोहोचले असता त्यांना मारहाण करण्यात आली. 

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये पीडित सैनिक अरविंद सिंग यांनी सांगितले की, “माझा मित्र राजवीर शेखावत ११ ऑगस्टला रात्री त्याच्या मित्रांसोबत पार्टीला गेला होता. पोलिसांनी वाईन क्लबवर छापा टाकल्यानंतर त्याला शिप्रपथ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मला माहिती मिळताच मी पोलीस ठाण्यात गेलो. मी अटकेचे कारण विचारले असता माझ्याशी असभ्य वर्तन करण्यात आले. मला विवस्त्र करण्यात आले, रिमांड रूममध्ये नेऊन मारहाण करण्यात आली." याशिवाय राजस्थान पोलीस हे लष्कराचे बाप असल्याचेही पोलिसांनी म्हटलं.

लष्कराच्या जवानासोबत झालेल्या मारहाणीचे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड जयपूरमधील शिप्रापथ पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी सहायक पोलिस आयुक्त मानसरोवर संजय सिंह यांना धारेवर धरलं. "काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाला जयपूरमध्ये काही पोलिसांनी विवस्त्र करून मारहाण केली. यानंतर, त्याला विवस्त्र करून लोकांमध्ये बसवल्यानंतर, काही पोलिसांनी त्याला पुन्हा सांगितले की पोलिस हे भारतीय सैन्याचे बाप आहेत. हे अत्यंत खेदजनक आहे, यावरून त्या २-३ पोलिसांची घृणास्पद मानसिकता दिसून येते. मी राजस्थान पोलिसांचा आदर करतो आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे की ते अशा घृणास्पद मानसिकतेच्या पोलिसांवर कारवाई करतील," असे राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीIndian Armyभारतीय जवान