नवी दिल्ली - देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी ( 15 जानेवारी ) भारतीय सैन्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील अमर जवान ज्योति येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत, नौदलाचे प्रमुख सुनील लांबा आणि हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी यावेळी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
भारतीय सेनेकडून दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन साजरा करण्यात येतो. 15 जानेवारी 1949 रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्र हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त 15 जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो. सैन्य दिनानिमित्त दिल्लीत आर्मी डे परेडचे आयोजन केले जाते.
भारतीय सैन्य दिनानिमित्त तिन्ही सैन्य दलानं राजधानी दिल्लीतमध्ये शक्तीप्रदर्शन केले. केएम करियप्पा ब्रिटिश सेनेतील पहिले भारतीय होते ज्यांना 1942 मध्ये एका युनिटचे कमांडर बनवण्यात आले होते. करियप्पा यांजा जन्म 28 जानेवारी 1899 रोजी झाला होता. पहिल्या महायुद्धानंतर ते ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये सेवेत रुजू झाले. त्यांनी आपल्या सैन्य कारर्कीदीची सुरुवात कर्नाटक इन्फ्रट्रीपासून केली.