जम्मू/नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दरम्यान, पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या जवानांनाला लक्ष्य करण्यासाठी कारवाया सुरू केल्या आहे. पाकिस्तानी सैन्याची बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) भारतीय जवानांना लक्ष्य करत हल्ले करत असून, भारतीय जवानांकडून हे हल्ले आणि जवानांकडून सातत्याने परतवून लावले जात आहेत. लष्कराच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ''नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांदरम्यान, पाकिस्तानी सैन्याच्या बॅट टीमकडून भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचे कारस्थान सुरू आहे. गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याच्या पोस्टवर अचानक हल्ला करण्याची जबाबदारी बॅट टीमवर सोपवली आहे. या टीममध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत जैश आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांच्या समावेश आहे. या टीमकडूनच भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र भारतीय जवानांनी हे हल्ले हाणून पाडले आहेत.'' एलओसी आणी सरहद्दीवर होत असलेल्या गोळीबाराआडून घुसखोरीचा प्रसत्न सुरू असल्याचा अलर्ट गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना पाठवला होता. तसेच पाकिस्तानकडून होणाऱ्या कुठल्याही संशयास्पद हालचालीला चोख प्रत्युत्तर देण्याची सूट लष्कराला देण्यात आली आहे.
LOC जवळ भारतीय जवान दररोज परतवून लावताहेत पाकिस्तानच्या BATकडून होणारे हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 9:32 PM