शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अमेरिकेच्या सैन्यासारखं भारतीय सैनिकांनाही मिळणार 'खास हेल्मेट'; रात्रीच्या मोहिमांसाठी ठरणार उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 7:04 PM

संरक्षण मंत्रालयानं भारतीय लष्करातील जवानांसाठी ५५६ ऑगमेंटेड रिआलिटी हेड माऊंटेड डिस्प्ले ((Augmented Reality Head Mounted Display) सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

संरक्षण मंत्रालयानं भारतीय लष्करातील जवानांसाठी ५५६ ऑगमेंटेड रिआलिटी हेड माऊंटेड डिस्प्ले ((Augmented Reality Head Mounted Display) सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अत्याधुनिक हेल्मेटच्या माध्यमातून खांद्यावरुन लाँच केल्या जाणाऱ्या मिसाइल सिस्टम आणि ZU सिस्टमसारख्या लँड बेस्ड एअर डिफेंस सिस्टमची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याशिवाय रात्री होणाऱ्या दहशतवाद विरोधी मोहिमांमध्येही भारतीय सैनिकांना या हेल्मेटनं मोठा फायदा होणार आहे. ( Indian Army to get 556 ARHMD systems know all about it)

खास पद्धतीनं डिझाइन करण्यात आलेल्या या हेल्मेटच्या माध्यमातून जवानांना रडार आणि थर्मल इमॅजिंक फोटोज मिळणार आहेत. याचा वापर करुन रात्रीच्या अंधारात जवानांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही मोसमात शत्रुवर हल्ला चढवता येणार आहे किंवा शत्रुचा अचूक वेध घेता येणार आहे. लवकरच या अत्याधुनिक हेल्मेटची खरेदी भारतीय संरक्षण विभागाकडून केली जाणार आहे. 

नेमकी काय असते हेड माऊंटेड सिस्टम?हेड माऊंटेड डिस्प्ले म्हणजे एक डिस्प्ले डिव्हाइस असतं. हे हेल्मेटसारखं डोक्यावर परिधान करता येतं. याच्या समोरच्या बाजूस एक छोटासा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यापद्धतीनं गेमिंग स्टेशन, एव्हिएशन इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण असतं. त्याचपद्धतीनं सैन्यातील जवानांसाठीचं हेल्मेट डिझाइन तयार करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सैन्याकडून या डिव्हाइसचा याआधीच वापर केला जात आहे. आता भारतीय सैनिक देखील लवकरच याचा वापर करणार आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानUSअमेरिकाIndiaभारत