नवी दिल्ली - भारतीय लष्कराने (Indian Army) सैन्य दिनाच्या (Army Day) दिवशी आपला नवा कॉम्बेट यूनिफॉर्म म्हणजेच ऑपरेशन दरम्यान घालण्याचा गणवेश प्रदर्शित केला. पॅराशूट रेजिमेंटचे कमांडोज हा नवा डिजिटल पॅटर्नचा युनिफॉर्म परिधान करून मैदानावर मार्च करताना दिसून आले. महत्वाचे म्हणजे, एका दशकाहून अधिक काळानंतर लष्कराने आपला युनिफॉर्म अथवा गणवेश बदलला आहे.
अशी आहे युनिफॉर्मची खासियत -या नव्या युनिफॉर्ममध्ये डिजिटल पॅटर्नसोबतच कपड्यातही बदल करण्यात आला आहे. यात 70 टक्के कॉटन आणि केवळ 30 टक्के पॉलिस्टर वापरण्यात आले आहे. यामुळे भारतीय आर्द्र आणि उष्ण हवामानातही सैनिकांसाठी युनिफॉर्म आरामदायक असले. विशेष म्हणजे हा युनिफॉर्म बराच दिवस वापरता येईल आणि सुकायलाही कमी वेळ लागेल.
जंगल आणि वाळवंटी भाग लक्षात घेत करण्यात आला डिझाइन -हा युनिफॉर्म ऑलिव्ह ग्रीन आणि माताडी रंग एकत्रितपणे वापरून आणि भारतातील जंगल आणि वाळवंटी भागाचा विचार करून तयार करण्यात आला आहे. यामुळे सैनिकांना वेगवेगळ्या भागांत लपण्यास मदत होईल. या युनिफॉर्मचे फॅब्रिक हलके आहे. यामुळे ते अधिकाळ घालणेही आरामदायक असेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे 8 विद्यार्थी आणि एका प्राध्यापकाच्या गटाने एक वर्षाहून अधिक काळ मेहनत घेतली हा युनिफॉर्म तयार केला आहे. तो टिकाऊ, वजनाला हलका, आरामदायक आणि सर्व भूभागांमध्ये लपण्यास त्याची मदत होईल ही वैशिष्ट्ये लक्षात घेत तो तयार करण्यात आला आहे.