शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
3
“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा
4
गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?
5
महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?
6
IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या मालिकेतून वेगवान गोलंदाज OUT
7
“राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना
8
90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर
9
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
10
काँग्रेसकडून भाजपाला धक्का, दोन माजी आमदारांचा कांग्रेसमध्ये प्रवेश
11
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
12
Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
५ मिनिटं अभिनेत्रीला जबरदस्तीने किस करत राहिला सुपरस्टार; रडत राहिली हिरोईन
14
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
15
PM Internship Scheme : काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
16
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
17
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
18
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
19
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
20
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी

ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरमधील धरण परिसरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; मदतकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 12:06 PM

सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हेलिकॉप्टरला अपघात; धरण क्षेत्रात हेलिकॉप्टर कोसळलं

श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या कठुआ जवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. कठुआतील रणजीत सागर धरणात हेलिकॉप्टर कोसळलं. सध्या मदतकार्य सुरू असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळलं आहे.  धरणात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं. प्राप्त माहितीनुसार, सकाळी १० वाजून २० मिनिटांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं. हेलिकॉप्टर धरण परिसरात कमी उंचीवर घिरट्या घालत होतं. त्याचवेळी ते धरणात कोसळलं.

घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम धरण परिसरात पोहोचली. सध्या पाणबुड्यांच्या मदतीनं धरणात बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरमध्ये किती जण होते, हा अपघात नेमका कसा झाला याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीलादेखील लष्कराचं एक हेलिकॉप्टरमध्ये जम्मूमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं. त्यात दोन पायलट होते. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान