भारताच्या प्रस्तावानंतर आणि प्रयत्नांनंतर संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष ‘इंटरनॅशनल मिलेट ईयर’' म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्सचे उद्घाटन केले आणि टपाल तिकिटे आणि नाण्यांचे अनावरणही केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधीत केले.
भयंकर! तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू, 19 जखमी
पीएम मोदी म्हणाले होते की, भारत जागतिक स्तरावर भरड धान्य किंवा धान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. प्रतिकूल हवामानात आणि रसायने आणि खतांचा वापर न करता भरडधान्य किती सहजतेने पिकवता येते याबद्दल त्यांनी सांगितले. यानंतर आता या पारंपरिक धान्याचा भारतीय लष्कराच्या जेवणातही समावेश करण्यात आला आहे.
भारतीय लष्कराने जवानांना दिल्या जाणाऱ्या रेशनमध्ये मोठा बदल केला आहे. ५० वर्षांनंतर लष्कराने सैनिकांच्या रेशनमध्ये देशी आणि पारंपरिक धान्याचा समावेश केला आहे. सैनिकांना दिल्या जाणाऱ्या रेशनमध्ये आता बाजरीच्या पीठाचा समावेश केला आहे. उत्तर सीमेवर तैनात असलेल्या जवानांना बाजरीचे पीठ आणि त्यापासून बनवलेले पदार्थ देण्यावर भर दिला जात आहे.
गव्हाचे पीठ आल्यानंतर बाजरीचे पीठ बंद करण्यात आले होते. आता सैनिकांना एकूण रेशनच्या २५ टक्के गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे पीठ दिले जाणार आहे. सैनिकांना २५% पर्यंत निवडण्याचा पर्याय असेल. बाजरी आता सर्व श्रेणीतील सैनिकांच्या दैनंदिन आहाराचा भाग असेल. बाजरीचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक परिषदेदरम्यान सांगितले होते की, भारताच्या भरड धान्य मिशनमुळे २.५ कोटी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल. आज राष्ट्रीय खाद्य बास्केटमध्ये भरड तृणधान्यांचा वाटा फक्त ५-६ टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी भारतातील शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ज्ञांनी वेगाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यासाठी उद्दिष्ट साध्य करावे लागेल, असंही मोदी म्हणाले.