जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा जवान मुख्तार अहमद याची दहशतवाद्यांनी त्याच्या घरात घुसून हत्या केली. कुलगाममधील शुरतमध्ये अहमद राहत होता. जम्मू काश्मीरमध्ये 200 दहशतवादी असल्याचे नुकतेच लंष्करप्रमुखांनी वक्तव्य केले होते. काही महिन्यांपूर्वीच काश्मीरचा रहिवासी असलेल्या औरंगजेबची अपहरन करून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यानंतर एका पोलीसाचीही हत्या करण्यात आली होती. आज मुख्तार अहमद या जवानाची त्याच्या राहत्या घरात घुसून दहशतवादांनी हत्या केली.
दहशतवाद्यांकडून भारतीय जवानाची घरात घुसून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 14:43 IST